rubber pineapples are flourishing and forests are dying eliminate native trees water level is decreasing day by day
rubber pineapples are flourishing and forests are dying eliminate native trees water level is decreasing day by daySakal

Kolhapur News : रबर, अननस फोफावतेय अन्‌ जंगल कोमेजतेय

देशी वृक्ष संपवण्याचा चंग; दिवसेंदिवस खालावतोय जलस्तर

कोल्हापूर : कोल्‍हापुरातून आंबोली आणि तेथून घाटमार्गे दोडामार्गाकडे उतरले की, जाताना डाव्या बाजूला रबराची शेती पाहायला मिळते. ठिकठिकाणी वणवे लागल्याचे दिसत असताना याच नैसर्गिक जंगलास लागून असणारी रबराची शेती मात्र हिरवीगार दिसत होती. तर काही ठिकाणी अननसाची शेतीही दिसत होती.

‘देशी वृक्षांपेक्षा रबर, अननसाची शेती ही पाणी अधिक शोषते,’ असा पर्यावरण तज्ज्ञांचा दावा आहे. नैसर्गिक जंगले संपवून, पीक पद्धतीत बदल करून अल्‍पकाळ फायदा होत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम सर्वांना भोगावे लागण्याचे चिन्ह आहे.

कोल्हापुरातून आजरा मार्गाला लागल्यानंतर गेल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोठे वृक्ष तोडल्याच्या खुणा दिसत होत्या. एका बाजूला नैसर्गिक तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जंगलातील फरक स्पष्ट दिसत होता.

मानवनिर्मित जंगलात निलगिरीचे वृक्ष पंचवीस ते तीस फुटांपर्यंत वाढले दिसत होते. पुढे आंबोली घाटातून उतरताना काही ठिकाणी वणवे लागल्याचे दिसत होते. खासगी जागांचा वापर कसा करावा, हा मूळ मालकाचा प्रश्न असला तरी त्यामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही, याची कोणतीच काळजी घेतली नसल्याचे दिसत होते.

देशाच्या समृद्धीमध्ये पश्‍चिम घाटाचे खूप मोठे योगदान आहे. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्‍ट्र, गुजरात या सहा राज्यांत पसरलेल्या पश्‍चिम घाटाने ४४ जिल्‍हे व १४२ तालुके व्यापलेले आहेत. जगातील अनेक दुर्मिळ वनस्‍पती, सरपटणारे प्राणी येथे सापडतात. गोदावरी, कृष्‍णा, कावेरी अशा ११ नद्यांचा उगमही याच पट्ट्यात झालेला आहे; मात्र, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली जंगल सफाई, रस्‍ते, धरण, ऊर्जा प्रकल्‍प व खाणकाम आणि शेतीच्या जमीन वापरातील बदल यामुळे पश्‍चिम घाटावर मोठे संकट उभे ठाकल्याचे दोडामार्ग परिसरातून फिरताना जाणवले.

दोडामार्गात एके ठिकाणी मोठा डोंगरच नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू होते. ते पाहण्यासाठी निघालो असता, सुरक्षारक्षकाने तातडीने फाटक बंद करून घेतले. त्यावरून केवळ दोडामार्ग नव्हे तर कोल्हापूर, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातून फेरफटका मारला असता पश्‍चिम घाटत सुरू असलेल्या घडामोडींची कल्‍पना येते. दोडामार्गसारखा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत समृद्ध व जैवविविधतेने परिपूर्ण तालुका अतिसंवेदनशील क्षेत्रातून वगळला आहे. खाणकाम, मोठ्या प्रमाणातील देशी वृक्षांची तोड, डोंगरांचे सपाटीकरण आदी पश्‍चिम घाटाच्या मुळावर उठले आहे.

नारळी, पोफळीवर कुऱ्हाड

कोकणातील नारळी, पोफळीच्या बागांवर मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड चालविली जात असून त्या जागी रबर व अननसाची शेती वाढत आहे. आसाम, मेघालय, केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर आता सिंधुदुर्गात अननस, रबराची शेती फोफावत आहे. केरळच्या उद्योजकांनी कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून रबराची शेती केली आणि भूमिपुत्रांवर स्‍वत:च्याच शेतात मजूर म्‍हणून राबण्याची वेळ आली आहे. आज सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी जिल्‍ह्यात किमान दोन हजार हेक्‍टरवर रबर शेती केली जात आहे. अननसच्या शेतीही वाढतच आहे. ही शेती पर्यावरणासाठी घातक ठरणारी आहे.

अननस, रबर शेतीला विरोधाची गाडगीळांनी केली होती शिफारस

दोडामार्गातून तिलारी घाटाकडे जाताना तेरवण मेढे गावाजवळ उजव्या बाजूच्या टेकड्यांवर अननसाची शेती पाहायला मिळाली. पूर्वी तेथे बांबू तसेच केळीच्या बागा होत्या, असे स्‍थानिक सांगतात. या शेतीची मालकी स्‍थानिकांपेक्षा परराज्यातील लोकांकडे अधिक आहे. दीर्घ मुदतीत भाडे तत्त्वावर ती घेतली आहे.

या शेतीसाठी स्‍थानिक लोकच मजूर म्हणून काम करत आहेत. अननस पिकामुळे जंगलाची छोट्या तुकड्यांत विभागणी झाली असून जमिनीचा पोत खराब होण्याबरोबर जैवविविधतेला धक्‍का लागत आहे. तसेच पिकवाढीसाठी घातक पदार्थांचा वापर होतो. त्यामुळे अशा प्रकारची शेती करू नये, अशी शिफारस ज्येष्‍ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी आपल्या अहवालात केली होती.

अशी आहे सद्यःस्थिती

  • महादेवगड परिसरात डोंगरांवर मोठी वृक्षतोड

  • वाढती रबर व अननस शेती

  • हत्तींचा उपद्रव टाळण्यासाठी अननस शेतीला पसंती

  • जंगलाच्या मधोमध उत्खनन, खाणकाम, अनेक प्रकल्प

हे आहेत परिणाम

  • स्वतःच्या शेतातच मजूर म्हणून राबण्याची वेळ

  • रबर व अननस अधिक पाणी शोषते

  • पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर घाला

  • मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींना फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com