
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले समरजीत घाटगे लवकरच घरवापसी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. समरजीत घाटगेंच्या भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रवेशाचा मुहूर्त काढणार असल्याचं समजते. महाविकास आघाडीकडून समरजीत घाटगेंनी कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात घाटगे यांच्या प्रवेशाची पुढील दिशा ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यात घाटगे यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचालींना वेग येणार असल्याची देखील माहिती आहे.