esakal | बेकिंग - संभाजी ब्रिगेडने संभाजी बिडीची विक्री पाडली बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Brigade stopped selling Sambhaji bidis kolhapur

कोल्हापूर स्टेशन रोड येथे आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना संभाजी नाव असलेला टेम्पो दिसला.

बेकिंग - संभाजी ब्रिगेडने संभाजी बिडीची विक्री पाडली बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापुरात संभाजी बिडी विक्रीला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पुण्याहून माल घेऊन आलेली गाडी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवली. कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर विकलेला माल परत घेण्यात आला.

कोल्हापूर स्टेशन रोड येथे आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना संभाजी नाव असलेला टेम्पो दिसला. अधिक चौकशी केली असता त्यात संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री चालू असल्याचे आढळून आले. 

संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत. त्यांच्या जीवन कालात त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही. महापुरुषाच्या नावाचा वापर बिडी आणि तंबाखूसारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांसाठी केल्याचे आढळून आल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला. 

निवेदनात म्हटले आहे, गुरुवारी सकाळी स्टेशन रोड येथे सभांजी बिडीची विक्री करणारा एक टेम्पो आढळला. या टेम्पोतून संभाजी बिडीचा शहरातील विविध विक्रेत्यांकडे पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. टेम्पो चालका विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

हे पण वाचाअन् राजू शेट्टींचा मुलगा धावला बहिणीच्या मदतीला

तर संबंधित व्यापाऱ्यांनाही विकत घेतलेला माल परत करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांनीही आपण असा माल विकणार नाही, असे लिहून दिले आहे. त्यामुळे उत्पादक व व्यापाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रपुरुषांच्या नावे, असा उद्योग करु नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल, असा इशारा दिला. यावेळी निलेश सुतार, उमेश जाधव, विकी जाधव, अभिजीत कांजर, अमरसिंह पाटील, संतोष चौगुले, विक्रमसिंह घोरपडे उपस्थित होते.  

संपादन - धनाजी सुर्वे

loading image
go to top