हे तर मराठा समाजाच्या बदनामीचे षड्‌यंत्र...! संभाजीराजेंचा घणाघात 

sambhaji raje chhatrapati comment on sarthi organisation
sambhaji raje chhatrapati comment on sarthi organisation
Updated on

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्थेचे (सारथी) कामकाज ठप्प पाडणे, हे मराठा समाजाच्या बदनामीचे षड्‌यंत्र आहे, असा आरोप खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून होतकरू मराठा समाजातील मुलांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

ते म्हणाले, ‘‘सारथी स्थापन होऊन एक वर्ष व्हायचे आहे. या स्थितीत परिहार नावाच्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्याचे सांगण्यात आले. तो जर दोषी असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. छत्रपती कधीच चुकीच्या माणसाबरोबर राहणार नाहीत. त्याची चौकशी सुरू असेल, तर त्याचा निकाल लावायला हवा होता. दहा महिने वाट पाहायची काय? मराठा समाजाला बदनाम करण्याच्या षड्‌यंत्राचा हा भाग आहे.’’

हे पण वाचा - बोलता, ऐकता येत नसतानाही मुर्तीत आणतो जीवंतपणा 

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सारथीच्या कामकाजात लक्ष घालावे. सारथीसाठी निधी नसेल, तर तसे बैठक घेऊन सांगावे. कोरोनाच्या संकटात निधीची कमतरता आम्ही समजू शकतो; मात्र, दहा महिने निधी का देऊ शकलो नाही, याचीही चर्चा होणे आवश्‍यक आहे. संस्थेसाठी पाच कोटी रुपये निधी आला होता. तो परत पाठवला गेला. मराठा समाजातील होतकरू मुलांसाठी सारथी आधारवड ठरणारी आहे. त्यामुळे सारथीचे अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.’’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur college student death investigation
Bhose Khind Murder Case
Panhala Pavan Khind Trek kolhapur
Kolhapur ATS investigation Pakistan links
Marathi News Esakal
www.esakal.com