Rajya Sabha Election 2022 I आजही संभाजीराजे आपल्या 'त्या' पराभवाबद्दल महाडिकांना जबाबदार धरतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Political news

संभाजीराजे यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र यात त्यांना यश मिळाले नव्हते

आजही संभाजीराजे आपल्या 'त्या' पराभवाबद्दल महाडिकांना जबाबदार धरतात

कोल्हापूर - सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या या निवडणुकीतील भूमिकेमुळे राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या निवडणुकीत अपक्ष लढणार असून इतर पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले होते. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देण्याची तयार दर्शवली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना शिवबंधन बांधण्याची अट घातली. दरम्यान, मी स्वाभिमानी असून खासदारकीसाठी शब्द मागे घेणार नाही असं वक्तव्य करत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेतून माघार घेतली. (Kolhapur Political news)

यानंतर राजकारणात अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. राज्यातील विरोधक, सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर निशाणा साधत संभाजीराजेंना फसवले असल्याची टीका केली. दरम्यान, या सर्व नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यसभेसाठी आता शिवसेना आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा एकदा चुरस पहायला मिळणार आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेने राज्यसभेवर कोल्हापूरचे अनुक्रमे दोन उमेदवार पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेकडून सजंय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'

एक बाजूला ही निवडणुक रंगणार असून आता नेत्यांच्या सभा आणि गाठीभेटींनी वेग घेतला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांना यश मिळाले नव्हते. 2009 साली राष्ट्रवादीकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांनी तिकीटाची मागणी केली होती. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने संभाजीराजेंना तिकट दिले होते. त्यावेळी महाडिक गटाने त्यांचा प्रचार केला नसल्याने संभाजीराजेंना त्या निवडणुकीत अपयश मिळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत संभाजीराजे त्यांच्या पराभवाला धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांना जबाबदार धरतात. त्यामुळे आता भाजपाने त्यांना उमेजवारी दिल्याने संभाजीराजे यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. या उमेदवारीच्या स्पर्धेत माजी खासदार महाडिकही होते, पण स्थानिक नेते व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांनाच उमेदवारी दिली होती. स्वच्छ प्रतिमा, शाहू महाराजांच्या घराण्याचा वारसा, काम करण्याची धमक असलेला उमेदवार असूनही त्यांचा पराभव झाला होता. त्यात महाडिक गटाची मदत त्यांना झाली नसल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता.

हेही वाचा: 'स्वार्थासाठी भाजपनं संभाजीराजेंची ढाल केली', राऊतांचा निशाणा

माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी तर एका कार्यक्रमातच यासंदर्भातील गौप्यस्फोट केला होता. तेव्हापासून महाडिक यांच्यापासून संभाजीराजे चार हात लांबच आहेत. तत्कालीन लोकसभा निवडणुकीतही अजूनही माझी जखम भळभळते, असे सांगत त्यांनी महाडिक यांच्याविरोधात प्रचार केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार लोकांपर्यंत पोहचवणे, ही माझी जबाबदारी आहे, असं संभाजीराजे म्हणाले होते. यावेळी संभाजीराजे यांनी कार्यक्रमातून व्यक्त केलेली नाराजी ही कशासाठी? हा प्रश्‍न मात्र राजकीय क्षेत्रात चर्चेला आला होता.

Web Title: Sambhaji Raje Holds Dhanjay Mahadika Responsible For 2009 Election Lok Sabha Loses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top