

Raigad Fort Illegal Hotels
esakal
Raigad Fort Encroachment Controversy : ‘दुर्गराज रायगडावर व्यावसायिक रोप-वे कंपनीकडून सुरू असलेल्या बेकायदा कामांना कुणाचे पाठबळ आहे व रायगडच्या संवर्धनापेक्षा या कंपनीच्या आर्थिक फायद्यास अधिक महत्त्व देण्याची काय गरज आहे’, अशी विचारणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरून केली आहे. रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रिटचे राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिल्याचा आरोप त्यांनी केला.