लय भारी! कोल्हापुरकराचा हातगाडी ते मर्सडीज बेंझ असा प्रेरणादायी प्रवास

Sanjay Patil  Successful as a Farsan entrepreneur in kolhapur
Sanjay Patil Successful as a Farsan entrepreneur in kolhapur
Updated on

कोल्हापूर - घरची गरिबी, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, आपण काय तर हातपाय हालवायला पाहिजे, म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचं काम स्विकारलं. हा काळ 1982 चा, नंतर फरसाणाच्या दुकानात त्यांनी काम सुरु केले. आता ते स्वतःच एक यशस्वी फरसाण उद्योजक बनले आहेत. फरसाणचे पाकिट हातगाडीवर ठेवून शहरभर फिरणारा माणूस आज मर्सडीज बेंझ या आलिशान कारमध्ये फिरत आहे. ही यशोगाथा आहे. बुधवार पेठत राहणाऱ्या संजय पाटील यांची.

महापालिके जवळच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना पाण्याचे ग्लास भरुन देण्याचे काम संजय यांनी स्विकारलं. महिन्याला 30 रुपये पगार मिळायचा. जगण्याला हातभार लागत होता. हे काम अचानक थांबलं. 1985 ला शनिवार पेठेत फरसाणाच्या दुकानात कामगार पाहिजे, अशी जाहिरात नजरेत आली आणि त्यांनी ते दुकान त्यांनी गाठलं. पगार 40 रुपये ठरला. पहाटे उठून गाड्यावर फरसाणचे पॅंकेट ठेवायचे अन्‌ शहरातली हॉटेल्स, कॅंटीनला फरसाण पोहोच करण्यासाठी फिरायचं असा त्यांचा दिनक्रम होता.

पुढे स्वतःच फरसाणची निर्मिती का करु नये? असा विचार त्यांनी केला आणि 1988 ला बुधवार पेठेतील घरीच फरसाणाची निर्मिती सुरु केली. तत्कालीन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते दुकानाचे उद्‌घाटन करुन नव्या व्यवसाय सुरू केला.
सर्व भावंडात संजय लहान. पण कामात मात्र ते थोर निघाले. शहरासह आसपासच्या खेड्यात सायकलवरुन त्यांनी फरसाणची विक्री सुरु केली. अल्पावधीतच त्यांच्या फरसाणाला पसंती मिळाली. मागणी वाढल्याने त्यांनी शहरात 'संजय फरसाण' म्हणून विविध दुकाने खुली केली.

कोल्हापुरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव जिल्हातून त्यांच्या फरसाणाला मागणी आहे. फरसाणाची खमंग चव आणि त्यातील विविध प्रकार हे त्यांचे वैशिष्ट्ये. वर्षाला लाखोची उलाढाल त्यांनी या उद्योगातून सुरु अलते. संजय यांचा एका हातगाडीचा प्रवास आज मर्सडीज बेंझ या आलीशान कारपर्यंत आला आहे यातून एका सर्वसामान्य कष्टकरी तरूण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास प्रेरणादायी आहे.

वेटर म्हणून काम करत होतो पण आपले ही काय तरी अस्तीत्व असावे, ही भावना कायम मनात होती. हातगाडीवर फरसाण विकत फिरलो पण आता मर्सडीजमध्ये फिरतोय. हा प्रवास कष्टाचा आहे. लहानापासून केलेल्या कष्टाचेच हे फळ आहे.
- संजय पाटील, फरसाण व्यवसायीक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com