
Sanjay Pawar met Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदावरील नियुक्तीवरून नाराज असलेले उपनेते संजय पवार यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतरही पवार यांची नाराजी कायम असून, पक्षात राहून काम करू, पण उपनेतेपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.