
Glass Broken Electricity Office : हलकर्णी (ता. चंदगड) येथील वीज वितरणच्या कार्यालयातील साहित्याची मोडतोड करण्यासह अधिकाऱ्याला मारहाण व डांबून ठेवल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने दोघांना येथील न्यायालयाने दोषी ठरविले. मधुकर गुंडू सावंत (४०) व राहुल भरमान्ना गावडे (३१, दोघेही रा. हलकर्णी) यांना दोन विविध कलमान्वये प्रत्येकी एक वर्षे सश्रम कारावास, दहा हजार दंड, न भरल्यास तीन महिने कारावास तर एका कलमाखाली सहा महिने सश्रम कारावास, एक हजार दंड व न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली. तिन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. दरम्यान, यातील गावडे हा सध्या हलकर्णीच्या सरपंच पदावर कार्यरत आहे.