विधान परिषद रणांगण; पाटील-महाडिक यांच्यात दुरंगी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

पालकमंत्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा - महाडिक

विधान परिषद रणांगण; पाटील-महाडिक यांच्यात दुरंगी लढत

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत चार उमेदवारांचे सहा अर्ज वैध ठरले आहेत. बनावट सह्या करून दिलेल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत निघाला. (Kolhapur Political News) दरम्यान, शुक्रवारी (२६) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व भाजपचे (BJP) उमेदवार माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यात दुरंगीच रंगणार आहे. दरम्यान, अर्ज छाननीवेळी मालमत्तेची माहिती दिलेली नाही. कर्ज घेतलेले आणि त्याचा विनियोग काय केला आहे याची माहिती दिली नाही, त्यामुळे पालकमंत्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा, असा आक्षेप माजी आमदार अमल महाडिक व सत्यजित कदम यांनी घेतला. (Maharashtra Legislative Council Election 2021)

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

विधान परिषदेसाठी ५ उमेदारांनी ७ अर्ज दाखल केले होते. यात संजय भिकाजी मागाडे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री पाटील, भाजपचे उमेदवार अमल महाडिक, शौमिका महाडिक (Shaunika Mahadik) व शशिकांत खोत (Shashikant Khot) यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. यात सौ. महाडिक व श्री. खोत हे अर्ज माघार घेऊ शकतात. त्यानंतर खरी लढत पालकमंत्री पाटील व अमल महाडिक यांच्यातच होईल. दरम्यान, छाननी दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी शपथपत्रामध्ये घरफाळा थकवल्याची माहिती दिलेली नाही. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व अर्जांची पडताळणी करून पालकमंत्र्यांच्या अर्जासह चार अर्ज वैध ठरविले आहेत.

इतरांनी बाहेर थांबावे

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी सुरू झाली. तत्पूर्वी सतेज पाटील व अमल महाडिक यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणाऱ्या व्यक्ती सोडून इतरांनी बाहेर जाऊन थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. यावेळी, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह इतर कार्यकर्ते बाहेर गेले. यावेळी श्री. महाडिक यांना थांबवून घ्यावे, असे आवाहन कार्यकर्ते करत होते.

हेही वाचा: जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

loading image
go to top