

Satej Patil Dhananjay Mahadik meet kolhapur
esakal
D Y Patil Memories : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या राजकारणातील जुने मतभेद बाजूला ठेवत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. धनंजय महाडिक यांनी पत्नी अरुंधती महाडिक यांच्यासह कसबा बावडा येथील सतेज पाटील आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.