
Sandipan Bhumare Police Case : हैदराबाद येथील सालार जंग कुटुंबीतील वंशजांकडून शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला १५० कोटींची भेट म्हणून दिल्याचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. तीन एकर जमिनीची तब्बल १५० कोटी रूपयांची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. यावर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली. यावेळी शेजारी असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी मिश्कील टीप्पणी केली.