
Satej Patil addressing the KSSDC conference in Kolhapur, highlighting development plans for Sangli, Satara, and Kolhapur.
Sakal
कोल्हापूर: ‘सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील भौगोलिक परिस्थिती, संस्कृती, लोकजीवन एकसारखे आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांचा एकात्मिक विकास झाला पाहिजे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्यांना जोडणारे रस्ते, रेल्वे विस्तारीकरण, उद्योजकांचे नेटवर्क, विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यावसायिक संघटनांनी एकत्र येऊन शाश्वत विकास आराखडा बनवला पाहिजे,’ असे मत उद्योजक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर, सांगली, सातारा डेव्हलपमेंट कॉरिडोअर (केएसएसडीसी) परिषदेत उद्योजकांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.