Satej Patil : 40 मंत्री नेमता येत नसतील तर राज्य चालवण्याचा निर्णय घेऊ शकतील का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur politics

सगळेच राज्य हे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणारे असेल तर हे चिंताजनक आहे - सतेज पाटील

Satej Patil : 40 मंत्री नेमता येत नसतील तर राज्य चालवण्याचा निर्णय घेऊ शकतील का?

कोल्हापूर : लोकशाहीची व्यवस्था अस्थित्वात न आणणे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केले. ब्रँड कोल्हापूर गौरव समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्रिमंडळाचा विस्तार होणे हे गरजेचे आहे. सगळेच राज्य हे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणारे असेल तर हे चिंताजनक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: लवकरच, लवकरच, लवकरच...; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

यावेळी पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकांशी थेट संवाद साधू शकतो यामुळे लोकशाहीत त्यांचे महत्व वेगळे आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्यामुळे राज्याचा कारभार चालावा म्हणून सचिवांना अधिकार दिले आहेत. जर ४० मंत्री नेमू शकत नाहीत, तर राज्य चालवण्याचा निर्णय हे घेऊ शकतात का असा प्रश्न सामान्य माणसांच्यामध्ये निर्माण झाला आहे.

पुढे ते म्हणाले, तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी एककीकडे हा निर्णय योग्य जरी असला तरीही लोकशाही व्यवस्थेमधील लोकप्रतिनिधी, मंत्रिपद , मंत्रिपरिषद हि व्यवस्था स्वीकारली आहे ती अस्तित्वात न आणण हि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान आम्हीही या मोहिमेत पक्षाच्यावतीने मोठ्या संख्येने सहभागी होत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले योगदान मिळवून दिले त्यांचे कौतुक होणे देखील अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाने देखील स्वातंत्र्यात मोलाचे योगदान दिले आहे

हेही वाचा: Politics : भास्कर जाधवांची राज्यपालांवर सडकून टीका; म्हणाले, राज्यपाल म्हणजे...

Web Title: Satej Patil Criticized To Shinde Fadnavis Govt On Cabinet Expansion Decision Pending

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..