

Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
esakal
Gokul Dairy Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच आतापासून विरोध सुरू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ हतबल असून, महायुती सोडून ते काय करू शकतील असे वाटत नाही, महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असली, तरी आमचे १८ ते १९ उमेदवार निश्चित झाले असून, निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथील अजिंक्यतारा कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या भूमिकेवर टीका केली.