Kolhapur Politics : सतेज पाटील यांनी असदुद्दीन ओवेसींना थेट सुनावलं, कोल्हापुरात ध्रुवीकरणाचा अजेंडा चालणार नाही; ओवेसींचेही उत्तर...

Satej Patil : कोल्हापुरात सौहार्दाचे आणि सलोख्याचे वातावरण आहे. त्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा येथे चालवून घेतला जाणार नाही.
Kolhapur Politics

Kolhapur Politics

esakal

Updated on
Summary

सतेज पाटील यांचा इशारा – कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी असून येथे ध्रुवीकरण चालणार नाही; असदुद्दीन ओवेसी यांनी कोल्हापुरात सौहार्दाचे वातावरण बिघडवू नये, अशी कठोर टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

भाजपवर हल्लाबोल – राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावरून पाटील यांनी भाजपची मानसिकता विकृत असल्याचा आरोप केला व काँग्रेस मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.

एमआयएमचे प्रत्युत्तर – राज्याध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाटील यांना “आमच्या व्यासपीठावर या, आमची भूमिका ऐका” असे आवाहन केले. ओवेसींना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाल्याची आठवण करून देत एमआयएम हा संविधान मानणारा नोंदणीकृत पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Owaisi Reply Satej Patil : कोल्हापूर ‘जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा आहे. त्यामुळे येथे शांतता आणि समानता आहे. कोल्हापुरात सौहार्दाचे आणि सलोख्याचे वातावरण आहे. त्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा येथे चालवून घेतला जाणार नाही’, अशी कानउघडणी आमदार सतेज पाटील यांनी आज केली. ओवेसी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com