
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे’, या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झाले आहेत. रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो काँक्रिटीकरणाचा की कसा? यावर त्याचे दर ठरत असतात. आम्हा लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री शक्तिपीठ महामार्ग करणार नाहीत. डिसेंबर- जानेवारीमध्ये आम्ही भव्य कागल कीर्तन महोत्सव घेणार आहोत.’ असे मुश्रीफ म्हणाले.