
Shaktipeeth Expressway : गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी देण्यासाठी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज(ता.०४) शुक्रवारी कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात जाऊन विठ्ठल चरणी साकडे घालणार आहेत. हे शेतकरी सकाळी ११ वाजता पंढरपूरच्या अलीकडे छत्रपती शिवाजी चौकात एकत्र जमून विठ्ठल मंदिराकडे जाणार आहेत. तेथे ते विठ्ठलाचे दर्शन घेऊन साकडे घालणार आहेत.