

सत्ता किंवा उपमुख्यमंत्री महत्वाचे नाही, तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे हे दाखवून द्यावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी आज केले.
esakal
Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची गरज नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांनी केलेल्या ४३ एकर जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती दिली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्राचे हित जोपासण्याचे काम करावे, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे स्थान पहिले आहे, सत्ता किंवा उपमुख्यमंत्री महत्वाचे नाही, तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे हे दाखवून द्यावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी आज केले. काँग्रेस कमिटीत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.