
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शक्तिपीठाच्या ड्रीम प्रोजेक्टसमोर हतबल झाल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली, तर ‘शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री शक्तिपीठ महामार्ग करतील. विरोधकांकडून विरोधच केला जाणार असल्याचे प्रत्युत्तर देत मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री आबिटकर यांनी पाटील यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ त्याचबरोबर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे तिघेही राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.