
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील - सतेज पाटील
'शिंदे गटात इच्छुकांची संख्या वाढल्यानं मंत्रिमंडळ विस्तारासाठी विलंब होत असावा'
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांनी महाराष्टाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचा शपथविधी होऊन बराच काळ लोटला आहे मात्र अजूनही राज्यात शिंदे सरकारतील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी गटातील नेत्यांकडून टोलेबाजी सुरु आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावरून शिंदे सरकावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: UP : शाळकरी विद्यार्थ्यांनी टोळ्या तयार करत ३ महिने घडवले बॉम्बस्फोट; ११ जणांना अटक
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने हे बाब चिंताजनक आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिमंडळासाठी विलंब होत असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षातील किमान चार-चार मंत्री तरी करा, असंही त्यांनी सूचवलं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा यासाठी जनतेनं निवदन द्यावं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे गोव्यासारखे लहान राज्य नाही. त्यामुळे गोव्याचा कारभार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालवू शकतात तसे महाराष्ट्राचे नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले आहेत. किमान दोघांनी मिळून चार चार मंत्री करावेत आणि खातेवाटप करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, तीन वर्ष पूर्ण होऊनही राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडाळाची स्थापना झाली तरच राज्याचा कारभार सुरुळीत असल्याचं दिसून येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची दिल्लीवारी सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा सुरु असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा: Pune : अपघातात प्राध्यापक महिला जागीच ठार, अंगावरून गेले डंपरचे चाक
Web Title: Satej Patil Says Increase Number Aspirants In Shinde Group Delay Expansion Of Cabinet Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..