Satej Patil I पक्षात सारं आलबेल आहे असं भाजपाने आजिबात समजू नये, सतेज पाटलांचं सचूक वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil latest political news

कॉंग्रेसचे सर्व आमदार 17 ते 18 जून रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत, पालकमंत्र्यांची माहिती

'पक्षात सारं आलबेल आहे असं भाजपाने आजिबात समजू नये'

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून आता घडामोडींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यसभेत झालेली चुक आम्ही विधान परिषदेत करणार नाही. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. कारण राज्यसभेतील परिस्थितीवरून आम्ही बरंच काही शिकलो आहोत, असंही वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. (satej patil latest political news)

आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रसेकडून आंदोलकांनी जोर धरला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. विधान परिषदेसाठी आमदारांना एकत्र करण्याचं कॉंग्रसेनही नियोजन केलं आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सर्व आमदार 17 ते 18 जून रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण...

पुढे ते म्हणाले, इतर पक्षांप्रमाणे कॉंग्रसनेही नियोजन केले आहे. आमदारांना मतदान आणि नियोजना याविषयी माहिती द्यायची आहे. त्यामुळे आमदारांना एकत्र करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. राज्यसभेतील पराभवासंदर्भात विचारले असता पाटील म्हणाले, पक्षातील आमदारांनी मतदान केले आहे. मात्र ज्यांनी लपवून मतदान केले त्यांच्याकडून फटका बसला आहे. महाविकास आघाडीत समन्वय होता मात्र आमच्याकडून काही कमी राहिल्याने हा पराभव स्विकारावा लागला आहे.

पंकजा मुंडेंना भाजपाने उमेदवारी नाकारली यासंदर्भात ते म्हणाले, भाजपमध्ये नाराजी प्रचंड आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षातील ओबीसी आमदार नेते नाराज आहेत. भाजप आमदारांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिथे नेण्यात आले होते. पक्षात सारं आलबेल आहे अस भाजपाने समजू नये, असं सूचक वक्तव्यही पालकमंत्री पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा: भाजप खासदाराचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांशी 'दोस्ताना'?

Web Title: Satej Patil Says Vidhan Parishad Election 2022 Bjp Condition Not Good In Politics Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top