

Kolhapur Election Breaking News
esakal
Kolhapur Politics : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील लढतीत शारंगधर देशमुख यांनी मोठा विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस नेते तथा आमदार सतेज पाटील यांची साथ सोडल्यानंतर देशमुख यांनी स्वतंत्र राजकीय ताकद दाखवत काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा तब्बल तीन हजार मतांनी पराभव केला. कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी झाली आहे.