

Satej Patil Dhananjay Mahadik
esakal
Gokul Milk Union Satej Patil Dhananjay Mahadik : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असतानाच पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना भीमा साखर कारखान्याच्या कारभारावरून थेट लक्ष्य केले. ‘दुसऱ्यावर बोट दाखवण्यापूर्वी पंढरपूरच्या भीमा साखर कारखान्यावर एक फेरी मारून या. कामगारांचे पगार द्या, बिले द्या आणि कारखाना सुरळीत चालवा,’ असा टोला त्यांनी लगावला. गोकुळच्या सत्तासंघर्षावर बोलताना चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केवळ सत्ता मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.