Kolhapur News : सोमवार ते शनिवार, एक रुपयात उपचार

Health Care in Kolhapur : सावली केअर सेंटरचा दवाखाना ग्रामीण भागात ठरतोय वरदान
सावली सुदृढ गाव योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार फक्त एक रुपयात केला जातो.
सावली सुदृढ गाव योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार फक्त एक रुपयात केला जातो. esakal

Kolhapur : अंगात कणकण आहे. ताप, सर्दी अन् खोकला आहे. मग कशाला दवाखान्याची पायरी चढायची आणि खिशाला कात्री मारायची, ही ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता. अंगावर काढलेले दुखणे कधी गंभीर रूप धारण करू शकेल, याची कल्पनाही त्यांना नसते. या लोकांकडून केवळ एक रुपये शुल्क घेऊन उपचार केले जात आहेत. ‘सावली सुदृढ गाव योजनेंतर्गत’ ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी हा दवाखाना वरदान ठरला आहे.

रोज आठ तास व आठवड्यातून सहा दिवस हा दवाखाना सुरू असतो. सावली केअर सेंटरतर्फे ग्रामीण भागातील लोकांसाठी ही दोन वर्षांपूर्वी योजना सुरू केली. करवीर तालुक्यातील बाचणी, म्हारुळ, तर शाहूवाडीतील कापशी येथे योजनेंतर्गत दवाखाने सुरू आहेत. प्रत्येक दवाखान्यात दररोज सरासरी पंचवीस रुग्ण उपचारासाठी येतात. एम. बी. बी. एस, बी. ए. एम. एस, बी. एच. एम. एस. अर्हतेचे डॉक्टर्स व एक मदतनीस तेथे कार्यरत आहेत.

सावली सुदृढ गाव योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार फक्त एक रुपयात केला जातो.
Kolhapur News : आता रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती, तांत्रिक अडचणीही होणार दूर

रुग्णांकडून रोज एक रुपयाप्रमाणे ३६५ रुपये शुल्क आकारले जाते. त्यांना एक कार्ड दिले जाऊन त्यात आवश्‍यक नोंदी करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे दवाखान्यात उपलब्ध असलेल्या गोळ्या व इंजेक्शन्स त्यांना देण्यात येते. त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही. आवश्‍यक औषधांसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जाते. ज्याकरिता रुग्णांना दहा टक्के औषध खरेदीत सवलत दिली जात आहे.

लसीकरणाची सुविधा येथे आहे. रविवार वगळता रोज आठ तास सेवा देण्याचे काम केले जात आहे. लहान आजारांसाठी एकही योजना कार्यान्वित नसल्याने ट्रस्टने पुढाकार घेऊन दवाखाने सुरू केले आहेत. ग्रामपंचायतींशी संलग्न होऊन ते सुरू केले आहेत. स्त्रिया, लहान मुले, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमही हाती घेतले जात आहेत.

ग्रामपंचायतीने जागा दिल्यास दवाखाना

कोणत्याही आजारासाठी जनरल प्रॅक्टिशनरकडे तपासणीसाठी गेल्यास सुमारे साठ ते ऐंशी रुपये खर्च होतात. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना इतके रुपये देण्याची ऐपत नसते. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ५०० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करतील, तेथे हे दवाखाने सुरू करण्याचा ट्रस्टने निर्णय घेऊन रुग्णांच्या सेवेत वाहून घेतले आहे.

सावली सुदृढ गाव योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार फक्त एक रुपयात केला जातो.
Kolhapur Rain : कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस; 'इतक्या' लाखांचं नुकसान, आजही पावसाची शक्यता

पॅथॉलॉजी लॅबचे कामही सुरू

पहिल्या टप्प्यात दवाखाने सुरू झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील पॅथॉलॉजी लॅबचे कामही सुरू झाले आहे. दहा गावांसाठी एक लॅब व अन्य गावांत कलेक्शन सेंटर्सद्वारे सँपल कलेक्शन केले जाणार आहे. पॅथॉलॉजी लॅबमध्ये तीस प्रकारच्या टेस्टस मार्केट रेटच्या पन्नास टक्के दरात केल्या जाणार असून, त्या कॉम्प्युटराईज्ड असतील. तिसऱ्या टप्प्यात डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले जाणार असून, चौथ्या टप्प्यात जिल्हा पातळीवर तीनशे बेडचे रुग्णालय उभारले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com