Kolhapur Rain : कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस; 'इतक्या' लाखांचं नुकसान, आजही पावसाची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Kolhapur Rain Update) झाला.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Update esakal
Summary

आजऱ्यासह उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले.

कोल्हापूर : जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Kolhapur Rain Update) झाला. अचानक आलेल्या वळवाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस झाला. कागल (Kagal) तालुक्यातील नानीबाई चिखली येथे तीन घरांचे नुकसान अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Update : कागल, भुदरगडला वळवाने झोडपले; वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळली

इचलकरंजीत दमदार हजेरी

इचलकरंजी : वळीव पावसाने (Ichalkaranji Rain) शनिवारी वस्त्रनगरीत दमदार हजेरी लावली. सायंकाळी साडेसातनंतर विजांच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्याची तारांबळ उडाली होती. तर, खबरदारी म्हणून महावितरण कार्यालयाकडून शहराची वीज खंडित करण्यात आली होती. गेले दोन दिवस सायंकाळनंतर केवळ ढगाळ वातावरण होत होते. त्यामुळे उष्म्यामध्ये आणखी वाढ होत होती. शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट करीत पावसाने वस्त्रनगरीत जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती.

शिरोळमध्ये तासभर पाऊस

शिरोळ : विजांच्या कडकडाटासह शिरोळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व शनिवारी बाजारचा दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठी धांदल उडाली. सायंकाळी सातच्या सुमारास शिरोळ, घालवाड, कुटवाड, शिरटी व शिरोळ परिसरात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली.

Kolhapur Rain Update
Water Crisis : यंदा पाऊस लांबला तरी पुरेसे पाणी; कोयना, चांदोली धरणात किती आहे पाणीसाठा?

गडहिंग्लजला जोरदार पावसाने झोडपले

गडहिंग्लज : शहरासह परिसरात आज सायंकाळी जोरदार वळीव बरसला. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरात तीन-चार वेळा वळीवाने तालुक्यात हजेरी लावली होती. विशेषत: तालुक्याच्या पूर्व व नेसरी भागात चांगला पाऊस झाला होता. मात्र, शहरासह परिसरात वळीव बरसलाच नव्हता. दोन-तीन वेळा तुरळक सरी कोसळून गेल्या होत्या. दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी पावसाचे वातावरण झाले होते. पण, त्याने हुलकावणीच दिली होती. दरम्यान, आज सायंकाळी आकाश दाटून आले. सहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दीड तास जोरदार पाऊस कोसळत होता. शहरात अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. शहराला तळ्याचे स्वरुप आले होते. शहरालगतच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

तुरंबे, सरवडे परिसरात वळीव

सरवडे : आकनूर, तुरंबे, सरवडे परिसराला वळवाने झोडपले. रात्री नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. सुमारे तासभर या परिसरात पाऊस झाला. धूळवाफ पेरणीपूर्व मशागत कामासाठी हा पाऊस उपयुक्त आहे.

कोवाड परिसराला झोडपले

कोवाड : येथील परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. तेऊरवाडी येथील ग्रामपंचायत इमारतीवरील पत्र्याचे शेड वादळी वाऱ्याने उडून शेजारच्या मारुती पाटील यांच्या घरावर पडल्याने अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. सायंकाळी चार वाजता सुरू झालेला पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होता.

Kolhapur Rain Update
ढेबेवाडी खोऱ्याला वादळी पावसाचा जोरदार तडाखा; घरे-दुकानांसह शाळांचे नुकसान, झाडे मोडली, विजेचे खांब वाकले

चिकोत्रा खोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी वळीव

पिंपळगाव : चिकोत्रा खोऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वळीव पाऊस झाला. पाल, बारवे, मुरुक्टे, मानवळे, पांगिरे, पिंपळगाव, केळेवाडी येथे मेघगर्जनेसह तासभर वळीव झाला. दरम्यान, कडगाव-पाटगाव परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले.

नानीबाई चिखलीत तीन घरांचे नुकसान

नानीबाई चिखली : सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे नानीबाई चिखली परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या या वादळी पावसात सुमारे सहा-सात घरांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. चिखली - कोडणी रोडवर असलेल्या बेनाडे वस्तीवरील तीन घरांवर काही अंतरावरील शेड उडून पडल्यामुळे तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बेनाडे वस्तीनजीक असणाऱ्या हरीश पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या आकाराचे शेड वादळी वाऱ्यामुळे उडून राजाराम बेनाडे, विठ्ठल बेनाडे, विजय बेनाडे यांच्या घरावर येऊन पडले, यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. तर चौगुले, मगदूम वस्तीवरील धनाजी घाटगे, यशवंत मगदूम यांच्या जनावरांसाठी उभारलेल्या शेडचेही वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

Kolhapur Rain Update
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

हाजगोळी खुर्दमध्ये नारळाच्या झाडावर कोसळली वीज

आजरा : आजऱ्यासह उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले. आज सायंकाळी पावणेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस पडत होता. आजरा शहरात रस्ते व गटारीतून पाणी वहात होते. या पावसामुळे ऊस व काजू पिकाला फायदा होणार आहे. वादळी पावसामुळे सुमारे पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. आजरा सूतगिरणीजवळ ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजरा शहरासह ६० गावे अंधारात होती. दरम्यान, हाजगोळी खुर्द (ता. आजरा) येथील आनंदा दत्तू हरेर यांच्या घराशेजारील दोन नारळाच्या झाडांवर वीज पडल्याने झाडांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com