सावंतवाडी : लोबोंनी शिवप्रेमींची माफी मागावी; स्वराज्य संघटना

महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप
लोबोंनी शिवप्रेमींची माफी मागावी; स्वराज्य संघटना
लोबोंनी शिवप्रेमींची माफी मागावी; स्वराज्य संघटनाsakal

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या येथील पालिकेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी येत्या 48 तासात शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेच्यावतीने ॲड. अनिल केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

केलेल्या चुकीची नैतिक जबाबदारी स्विकारुन लोबो आणि त्यासोबत असलेल्या नगरसेविकांनी राजीनामा द्यावेत शिवाय आमदार दीपक केसरकर यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही ॲड. राजू कासकर यांनी केली.

लोबोंनी शिवप्रेमींची माफी मागावी; स्वराज्य संघटना
निपाणी : विद्यार्थ्यांनी बनविल्या दिवाळीच्या वस्तू

स्वराज्य संघटनेच्यावतीने येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, महेश पांचाळ, श्रीपाद सावंत, अॅड. राजू कासकर, अजित सांगेलकर, कृष्णा धुळपनावर आदी उपस्थित होते.

ॲड. केसरकर पुढे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेनेने आजपर्यंत राजकारण केले आहे; मात्र छत्रपतींचा उल्लेख एकेरी करणे ही चुकीची गोष्ट असून या घटनेचा स्वराज्य संघटना आणि शिवप्रेमी निषेध करत आहेत. पालिकेत सुरू असलेल्या राजकारणाबाबत आम्हाला काही पडल नाही; मात्र लोबो या पत्रकार परिषदेत एकेरी बोलत असताना बाकीच्या नगरसेवकांनीही त्यांना रोखले नाही ही सुद्धा तितकीच खेदाची बाब आहे. त्यामुळे आम्हा शिवप्रेमीतर्फे 48 तासांची मुदत देण्यात येत असून या 48 तासात त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे."

श्री. पांचाळ म्हणाले, "येत्या 19 फेब्रुवारीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी डौलाने उभा राहावा, अशी मागणी आम्ही नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे करणार आहोत. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून केले जाईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com