
Maharashtra Politics : कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह इतर ‘ड’ वर्ग महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक आज नगरविकास विभागातर्फे जाहीर करण्यात आले. यानुसार एक सप्टेंबरला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रभागरचनेची तयारी करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आता अधिकृतरीत्या वेळापत्रक जाहीर केल्याने या कामाला गती येणार आहे.