मग शाळा भरवायची कोठे? विद्यार्थ्यांचे काय होणार? 

School repairs are not completed on time
School repairs are not completed on time
Updated on

बेळगाव : गेल्या वर्षी बेळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे शाळांच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण होण्यास अडचण निर्माण झाल्याने पडझड झालेल्या शाळांसमोर शाळा कोठे भरवायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


बेळगाव जिल्हात गेल्या वर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात शाळांची पडझड झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक शाळा भाडोत्री इमारतीत किंवा समुदाय भवनमध्ये भरविल्या जात आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील बेळगाव शहर, तालुका, खानापूर, बैलहोंगल, कित्तुर, रामदुर्ग, सौंदत्ती विभागातील शाळांतील 818 वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी 74 लाख रुपयांचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आला होता. तसेच परीक्षा संपल्यानंतर दुरुस्तीसह बांधकामाची कामे हाती घेऊन पूर्ण केली जाणार होती. मात्र कोरानाच्या संकटामुळे कामे खोल्यांची दुरुस्ती होण्यास बराच काळ प्रतिक्षा करावी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्हा पंचायतीकडून निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबविने आवश्‍यक होते परंतु अनेक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे दुरुस्तीसाठी विलंब होणार आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 1386 वर्ग खोल्यांचे अधिक प्रमाणात तर 472 वर्ग खोल्यांचे कमी प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामध्ये पडझड झालेल्या शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा पंचायतीने शिक्षण विभागाकडून तातडीने प्रस्ताव मागविले होते. मात्र प्रस्ताव सादर झाल्यानंतर तब्बल सहा पाच महिन्यांनी निधी मंजूर करण्यात आला. मात्र संबधित विभागाने कामे वेळेत सुरु करण्याकडे दुर्लभ केल्यामुळे मंजुरी मिळालेल्या 41 शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी विलंब होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार असून कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरु होण्यास विलंब होणार आहे. याची दखल घेत शिक्षण खात्याने आवश्‍यक कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली पाहिजे, अशी मागणी शिक्षक व पालकांमधून होत आहे.

निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने कामे सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र लॉकडाऊनमुळे कामे बंद होती त्यामुळे जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून लवकरच कंत्राटदारांची बैठक घेतली जाईल. यावेळी कामे लवकर पूर्ण करा अशी सूचना करण्यात येणार आहे.

-रमेश गोरल, अध्यक्ष जिल्हा पंचायत शिक्षण व स्थायी कमिटी

शाळांच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आली आहेत.  त्यांच्याशी संपर्क साधून कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे.
ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधीकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com