कोल्हापूर : शाळा सुरू; कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन

आणि पुन्हा भरले वर्ग
School Start
School Startsakal
Updated on

कोल्हापूर : कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांचे दरवाजे आज पुन्हा उघडले. ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गात हजर राहून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. काही शाळांनी पर्यायी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील ४ लाख ७२ हजार ७४७ विद्यार्थी आज हजर राहिले.

School Start
Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांचे दरवाजे बंद केले. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उभा केला. मात्र, दोन वर्षांतील लॉकडॉऊनमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा किती फायदा झाला, यावर समाज घटकांतून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पालकवर्गाला कोरोनाची धास्ती असली तरी पाल्याच्या भविष्याची चिंता असल्याचे दिसले. प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकणे व ऑनलाईन अभ्यासक्रमाचे धडे गिरवणे, यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोबाईलकरिता हट्ट धरणारी व त्यावर गेम खेळणारे विद्यार्थी पालकांचे नजरेत भरले. त्यामुळे शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करावीत, असा सूर व्यक्त होऊ लागला.

School Start
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

आज शाळांचे दरवाजे खुले झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात हजर राहून धडे गिरवले. शहर व ग्रामीण भागातील शाळांत प्रार्थनेचे सूर आळवले गेले. शहरातील महापालिकेच्या ६५ शाळांचा घंटाही आज वाजल्या. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात बसविले.

दृष्टिक्षेपात...

  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये - ३६८८

  • आजपासून सुरू - ३६८१

  • एकूण विद्यार्थी - ६ लाख ६८ हजार ५६२

  • हजर विद्यार्थी - ४ लाख ७२ हजार ७४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com