
चंदगड : दाटे (ता. चंदगड) येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेचा सचिव सुनील महादेव देवण (रा. रामपूर, ता. चंदगड) याने गेल्या आर्थिक वर्षात ११ लाख २८ हजार १६४ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणातून उघडकीस आले. प्रमाणित लेखापरीक्षक निसार शेरखान (रा. चंदगड) यांनी आज येथील पोलिसांत त्याच्या विरोधात गैरव्यवहार व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.