

Kolhapur CM devendra fadanvis : एका खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री महोदयांच्या सुरक्षेत गंभीर चुका समोर आल्या. मंचावर मुख्यमंत्र्यापासून काही अंतरावरील एका खुर्चीवर अनोळखी इसम येऊन बसल्याचे निदर्शनाला येताच संबंधिताला ताब्यात घेतले. सुरक्षा कवच भेदून संबंधित मंचापर्यंत पोहोचलाच कसा? याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली. मंचासह मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू झाली आहे.