सदावर्ते वक्तव्य थांबवा नाहीतर कोल्हापूर पैलवानी हिसका दाखवू ; संघटनांचा इशारा

सदावर्ते वक्तव्य थांबवा नाहीतर कोल्हापूर पैलवानी हिसका दाखवू ; संघटनांचा इशारा

कोल्हापूर: राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी(Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj) मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिले. मात्र सध्याचे सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation)न्यायालयात रद्द झाले आहे. याचा निषेध करण्यासाठी विविध संघटनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासमोर आत्मक्लेश आंदोलन (Self-torture-agitation)करण्यात आले. यामध्ये राजमाता जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत अविव मराठा संघटना आणि सकल मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.Self-torture agitation in kolhapur Organization warn in gunratna sadavarte

मराठा समाजाला आरक्षण कसे द्यावे हे सरकारने ठरावे आणि वंचितांना याचा लाभ होऊ द्यावा.अशी मागणी करत छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपणाऱ्या संघटनांनी आज संविधानात्मक मार्गाने आंदोलनास पुन्हा सुरुवात केली.यावेळी छावा संघटनेचे राजू सावंत यांनी गुणरत्न सदावर्ते सारखे व्यक्तिमत्व समाजामध्ये दुफळी माजवत आहे. त्यांनी ही वक्तव्य थांबवले नाहीत तर कोल्हापुरातील पैलवानी पद्धतीने मुंबईहून त्यांना उचलून आणू असा इशारा विविध संघटनांच्या वतीने दिला.

सदावर्ते सारखे समाज विघातक लोक विविध घटकांमध्ये तेढ माजवत आहेत. त्याला आवर घालावा अन्यथा त्याला ठोकशाही ने उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी या आंदोलन प्रसंगी संघटनांच्या वतीने दिला.राजर्षी शाहु समाधी स्थळासमोर नव्वद मिनिटांचे प्रतीकात्मक आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये छावा संघटनेचे राजू सावंत, जिजामाता ब्रिगेडच्या सुनीता पाटील,लता जगताप, सुधा सरनाईक, गीता हसुरकर त्याचप्रमाणे आर. के. पो, फत्तेसिंग सावंत, बाळ घाटगे, जयदीप शेळके, उदय लाड, चंद्रकांत पाटील, सुषमा डांगरे, दीपक घोडके, मारुतराव कातवरे, अमर जाधव, विलास बोंगाळे,लता सासने, शारदा पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com