

allegations against MLA Shivaji Patil over Chandgad Jain temple land case file
esakal
Chandgad Jain temple land dispute : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील १३०० वर्षे जुन्या दिगंबर जैन मंदिराची जागा हडपण्याच्या उद्देशाने मंदिराच्या कामात अडथळा निर्माण करून, जैन धर्मगुरूंना शिवीगाळ व ट्रस्टीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन येथील रहिवासी चंद्रकांत प्रकाश पाटील यांनी बावधन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील आमदार शिवाजी पाटील (रा. चंदगड, कोल्हापूर) यांच्यावर आरोप केले आहेत.