
कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी अवकाळी पाऊस झाला. शाहूवाडी, मलकापूर, गडहिंग्लज, उत्तूर तसेच सेनापती कापशी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने ऊस पिकाला फायदा होणार आहे. मात्र, तंबाखू, शाळू कापलेल्या शेतकऱ्यांची मात्र धान्य आणि चारा वाचवण्यासाठी तारांबळ उडाली.