Shaktipeeth Highway Land Acquisition : अखेर सिंधुदुर्गमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात, कोल्हापूरच्या चंदगडमधून होणार प्रवेश

Land Acquisition Sindhudurg : महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमार्गे महामार्गाचा प्रवेश होणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Shaktipeeth Highway Land Acquisition Sidhudurg

Shaktipeeth Highway Land Acquisition Sidhudurg

ESAKAL

Updated on

Shaktipeeth Expressway : कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. दरम्यान, या विरोधाला झुगारून शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. या मार्गाच्या सुधारित आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. नव्या मार्गानुसार हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून सिंधुदुर्गात प्रवेश करत कुंभवडे, तळकट आणि झोळंबे मार्गे थेट बांदा येथे पोहोचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com