
Kolhapur Politics : शिरोळ तालुक्यातील ज्या गावांतून शक्तिपीठ महामार्ग जातो, तेथील ७० टक्के शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. तसे सात बाराही दाखविले.: शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे; मात्र आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत आहेत. क्षीरसागर यांना शक्तिपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांनी त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी आज केली.