
Hasan Mushrif and Mla Shivaji Patil : बारा जिल्ह्यांतून विरोध होत असताना शक्तिपीठ महामार्ग चंदगड मतदारसंघातून नेण्याची आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी अव्यवहार्य आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गापेक्षा आमदारांनी स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतानाच त्यांच्या या मागणीबद्दल आज झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यासाठी आज प्रमुख कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठही आवळली आहे.