

Shaktipith Expressway Land Survey Halted In Karveer As Acquisition Notices Removed From Aapli Chavdi Portal
sakal
कुडित्रे : करवीर तालुक्यात सप्टेंबरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी दिलेल्या मोजणीच्या नोटिसा ‘आपली चावडी’ शासकीय ऑनलाइन पोर्टलवरून अखेर हटवल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाने याला दुजोरा दिला असून यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या महामार्गाची टांगती तलवार कायम आहे.