

Shaktipith Expressway
esakal
Shaktipith Mahamarg Update : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित नागपूर–गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाबाबत महत्त्वाची घोषणा करत नव्या अलायमेंटची माहिती विधानसभेत दिली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची दिशा बदलण्यात आली असून, सोलापूरपासून पंढरपूर, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून हा महामार्ग जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मार्ग या जिल्ह्यांतून जाणारच असून, केवळ अधिक व्यवहार्य आणि विकासपूरक दिशा निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.