

Shaktipith highway villages list Kolhapur Sangli Sindhudurg Satara Solapur
esakal
Shaktipith highway Maharashtra route : ‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील अनेक गावांवर परिणाम होणार असून, या भागातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून या महामार्गामुळे एकूण १५० हून अधिक गावांना जोडणी मिळून वाहतूक, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल असा दावा केला जात असला, तरी जमीन संपादन, अपुरी भरपाई आणि संभाव्य विस्थापनाच्या मुद्द्यांमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे प्रकल्पाबाबत पुनर्विचार करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.