Shaktipith Expressway Protest: निवडणुका झाल्यानंतर शक्तिपीठ रेटण्याचा प्रयत्न, सतेज पाटील, राजू शेट्टी, करणार राज्यभर आंदोलन

Satej Patil on Shaktipeeth project : शक्तिपीठाच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील आणि राजू शेट्टी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. निवडणुकांनंतर या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.
Shaktipeeth highway project

Shaktipeeth highway project

esakal

Updated on: 

Shaktipith Expressway Issue Controversy : परभणी आणि लातूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर बळजबरी केली जात आहे. त्यामुळे कोणतेही नेतृत्व नसताना लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, गरज नसलेला शक्तिपीठ सरकारने करू नये. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही भूमिका बदलली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने जमीन मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव करावेत, असे आवाहन करत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गावरोधात सोमवारी (ता. २३) राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावर दोन्ही नेत्यांनी दिला. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघटनेच्या वतीने ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti
Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Marathi News Esakal
www.esakal.com