
Sharad Pawar On Narendra Modi
esakal
Narendra Modi Retirement Age : 'महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. जमिनी वाहून गेल्या आहेत तर सोयाबीन पिक पूर्ण उद्धवस्त झाले. शिवछत्रपतींच्या काळात दुष्काळ पडला त्यानंतर शेतकऱ्यांकडे आधुनिक शेती करायला साधने नव्हती नांगरट करण्यासाठी लोखंडी फाळ नव्हता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपत्तीमधील सोने बाहेर काढून त्याची नांगरट केली. असा दृष्टीकोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. परंतु सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत मिळत नाही.' अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दांवर चर्चा केली.