

Shirol election shocking results Mane family
esakal
Nagar Palika Election News Shirol : शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या त्यांच्या सुनबाई सारिका अरविंद माने यांचा दारुण पराभव झाला असून, त्यांचे सुपुत्र अरविंद अशोकराव माने यांचाही नगरसेवक पदासाठी पराभव झाला आहे. एकाच घरातून तिघांना उमेदवारी देणाऱ्या आमदार माने यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले असून, या निकालाची शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.