Jaysingpur Farmer : ऊसपट्ट्यातच चाऱ्याचा दुष्काळ; शिरोळमध्ये वाड्यासाठी शेकड्याला २०० रुपये
Mechanized Sugarcane Harvest : शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी सुरू झाल्याने जनावरांसाठी सहज उपलब्ध होणारा हिरवा चारा जवळपास गायब झाला आहे.
जयसिंगपूर : ऊसपट्टा अशी ओळख असणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस हंगामाने गती घेतली आहे. मात्र, यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी सुरू असल्याने यावर्षी गरजेप्रमाणे ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत.