कोल्हापूर : सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयंमहिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ झाला.
यावेली पालकमंत्री पाटील म्हणाले, ""केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना शासनाने आणली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा संपूर्ण राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी प्रारंभ होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू जनतेला अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. स्वस्त दरात, स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितपणे उपयुक्त होईल.''
हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...
जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे आदीसह बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या.
हे पण वाचा - बहुरूप्यांला का लागली अखेरची घरघर..?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज येथे महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर, ताराबाई रोड येथील श्री महालक्ष्मी भक्तमंडळ येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तसेच साईक्स एक्स्टेंशनमधील हॉटेल साईराज येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ झाला. या ठिकाणी अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे उपस्थित होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.