Kolhapur Election : आमदार, जिल्हाप्रमुखांचे चिरंजीव रिंगणात; शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी
Shiv Sena Shinde : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटात आमदार व जिल्हाप्रमुखांच्या चिरंजीवांसह मातब्बर इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महायुतीत शिंदे गटाला केवळ ३३ जागा मिळण्याची शक्यता असल्याने तिकीटासाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटातून आमदार आणि जिल्हाप्रमुखांच्या चिरंजीवांसह सुमारे १३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज आज मध्यवर्ती पक्ष कार्यालयातून घेतले आहेत. यापैकी सहा जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले.