Kolhapur Politics : चंदगडमध्ये मानापमानाच्या नाट्याने ठाकरे गट एकाकी; आघाडी न मिळाल्याच्या आक्रमकतेमुळे, शिंदे गटाची राजकीय समीकरणे बदलली
Shiv Sena Thackeray Group : आघाडीत सहभागासाठी निमंत्रण दिले नाही असा त्यांचा आरोप आहे, तर घडामोडी सुरू असताना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकदाही संपर्क साधला नाही अशी मित्र पक्षांची तक्रार आहे.
चंदगड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम केलेल्या मित्र पक्षांपैकी शिवसेना ठाकरे गट पक्ष इथल्या नगरपंचायत निवडणुकीत एकाकी पडला आहे.