
Kolhapur Shiv sena : ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढू आणि महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा असेल,’ असे स्पष्ट मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. निवडणुकीसाठी शिवसेना सभासद नोंदणीसह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील आढावा यावेळी घेण्यात आला.