Shivaji University Vice Chancellor : शिवाजी विद्यापिठाला तब्बल ९ महिन्यांनी कुलगुरू पद मिळालं; राज्यपालांकडून नियुक्ती

Shivaji University Kolhapur : तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळाले असून, कुलपतींकडून डॉ. आर. के. कामत यांची नियुक्ती करण्यात आली.
Shivaji University Vice Chancellor : शिवाजी विद्यापिठाला तब्बल ९ महिन्यांनी कुलगुरू पद मिळालं; राज्यपालांकडून नियुक्ती
Updated on: 

Dr RK Kamat appointment : आधी विद्यार्थी मग, प्राध्यापक म्हणून ज्या विद्यापीठात कार्यरत राहिले त्याच शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू होण्याचा सन्मान आज प्रा. डॉ. आर. के. तथा रजनीश कमलाकर कामत यांना लाभला. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. कामत यांची पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरुपदावर नियुक्ती केली. त्यांच्या रुपाने कोल्हापूर जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा कुलगुरुपदाची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com